Summary writing in Marathi
सारांश लेखन विषयी माहीती - Summary writing in Marathi मित्रांनो सारांशलेखन हा परीक्षेतील खुप महत्वपूर्ण भाग आहे . नववी , दहावी , बारावी इत्यादी कुठल्याही इयत्तेची परीक्षा असो आपल्याला सारांश लेखन हा भाग काही गुणांसाठी विचारला जात असतो . यात आपल्यासमोर एक मोठा परिच्छेद दिलेला असतो ज्याचे उतारयातील मुख्य मुददे अँड करून एक तृतीयांश भाग इतके आपणास सारांशलेखन करायचे असते . पण आपल्यातील खुप विदयार्थी असतात ज्यांना सारांशलेखन करणे खुप अवघड वाटत असते . म्हणुन परिक्षेत आपण सारांशलेखनचा 4 गुणांचा भाग सोडुन देत असतो . असे आपल्यासोबत देखील होऊ नये यासाठी आजच्या लेखात आपण सारांशलेखन म्हणजे काय ? सारांशलेखन कसे करावे ? हे जाणुन घेणार आहोत . सारांशलेखन म्हणजे काय ? सारांश लेखन म्हणजे परीक्षेत आपल्यासमोर पाठयपुस्तकाच्या बाहेरचा जो एक उतारा दिलेला असतो त्याचा एक तृतीयांश हा शब्दांत लिहुन दाखवणे होय . म्हणजे समजा आपल्यासमोर 150 शब्दांचा एखादा उतारा दिलेला असेल तर आपणास त्याला ...