कृतज्ञता महत्वाची
*🌹"कृतज्ञता" आपुलकीच्या माणसासाठी 🙏* *कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा.* *आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरूवात करा. या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख, अडचणी नाहीत. ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही हे सर्व भोगावं लागलंय. आपण तर साधारण मनुष्य आहोत. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरतो.* *कोणाच्या वाईट वागण्याने आपलं काहीही वाईट होत नसतं. मिळतं तेच जे आपण पेरलेलं असतं. आपल्याशी कोण कसही वागेना, आपण सगळ्यांशी चांगलंच वागायचं. इतकं चांगलं की विश्वासघात करणारा ही पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे. आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते, जेव्हा स्वतःच्या जीवनात संघर्ष करण्याची वेळ येते.* *आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी घाबरून जाऊ नका. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा आपण जिवंत आहोत म्हणजे खूप काही शिल्लक आहे. जी माणसं स...