Speech on Science and Superstitions
-
Good morning to everyone.
सर्वांना शुभ प्रभात. -
Honourable Principal, respected teachers, and my dear friends,
आदरणीय मुख्याध्यापक, माननीय शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, -
Today, I am going to speak on the topic "Science and Superstitions."
आज मी "विज्ञान आणि अंधश्रद्धा" या विषयावर भाषण करणार आहे. -
We live in the 21st century, the age of science and technology.
आपण २१व्या शतकात, म्हणजेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात जगत आहोत. -
Science has made our life easy and comfortable.
विज्ञानामुळे आपले जीवन सोपे आणि सुखकर झाले आहे. -
But many people still believe in superstitions.
पण आजही अनेक लोक अंधश्रद्धांवर विश्वास ठेवतात. -
Superstition means a blind belief without any scientific proof.
अंधश्रद्धा म्हणजे कोणताही वैज्ञानिक पुरावा नसताना ठेवलेला आंधळा विश्वास होय. -
We should not believe in such things.
आपण अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये. -
Great social reformers like Mahatma Phule, Raja Ram Mohan Roy, Gadge Maharaj, Dr. Narendra Dabholkar, and Prof. Shyam Manav worked hard to remove superstitions from society.
महात्मा फुले, राजा राममोहन रॉय, गाडगे महाराज, डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि प्रा. श्याम मानव यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी खूप प्रयत्न केले. -
Some common superstitions are:
काही सामान्य अंधश्रद्धा पुढीलप्रमाणे आहेत :
-
A cat crossing the road.
रस्ता ओलांडणारी मांजर अपशकून मानणे. -
Hanging lemon and green chillies outside shops.
दुकानाबाहेर लिंबू-मिरची टांगणे. -
Cutting nails at night.
रात्री नखे कापू नयेत असे मानणे. -
Ghosts living in peepal trees.
पिंपळाच्या झाडावर भूत राहते असे समजणे.
-
Science teaches us to think logically and believe in facts.
विज्ञान आपल्याला तर्कशुद्ध विचार करायला आणि सत्यावर विश्वास ठेवायला शिकवते. -
India's Chandrayaan-3 mission is a great example of scientific progress.
भारताची चांद्रयान-३ मोहीम ही वैज्ञानिक प्रगतीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. -
Let us develop a scientific attitude and remove superstitions from society.
चला, आपण वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करूया आणि समाजातून अंधश्रद्धा दूर करूया. -
Thank you. Have a nice day!
धन्यवाद! आपला दिवस आनंदाचा जावो!
Comments
Post a Comment